पुण्याला दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा

Khadakwasla-Dam
Khadakwasla-Dam

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट साठा
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सध्या साडेआठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. सध्या उन्हाळी पिकांसाठी सोडलेले आवर्तन पाहता शहराला आणखी किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे.

मागील पावसाळ्यात आणि त्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्प साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे काठोकाठ भरली होती. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये शंभर टक्के साठा झाला होता. भीमा खोऱ्यातील उजनी धरणही यंदा तुडुंब भरले होते. परंतु त्यातील पाणीसाठा आता उणे ३.२ टीएमसी झाला आहे. टेमघर धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे ते रिकामे केले होते. त्यामुळे त्या धरणातील पाणीसाठा शून्यावर आहे. घोड धरणातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. खडकवासला धरणात ०.४१ टीएमसी पाणी आहे.

पिकांसाठी आवर्तन

  • खरीप हंगामासाठी ९ जुलै ते १४ ऑक्‍टोबरदरम्यान खडकवासला प्रकल्पाच्या उजवा मुठा कालव्यातून ९.१० टीएमसी पाणी
  • रब्बी हंगामासाठी १५ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान सुमारे सहा टीएमसी पाणी
  • उन्हाळी पिकांसाठी एक मार्चपासून आवर्तन सुरू. गतवर्षी पाणीटंचाईमुळे उन्हाळी पिकांना पाणी देता आले नव्हते.

भीमा खोऱ्यातील प्रमुख धरणांतील साठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी)
०.८१ (७.९९) माणिकडोह
३.४९ (२७.९७) डिंभे
२.८४ (१५.३७)  मुळशी
३.२८ (४२.७३)  भामा आसखेड
३.४१ (२९.०७) नीरा देवघर
७.३६ (३१.३२) भाटघर
-३.५३ (-६.६७) उजनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com