इतिहासकालीन व्यक्तींचा अभ्यास करणारे स्वप्नील कोलते काळाच्या पडद्याआड

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 January 2021

इतिहासकालीन व्यक्तींच्या जिवणाचा अभ्यास करण्याचा छंद असणाऱ्या स्वप्नील कोलते या तरुणांच्या अपघाताती मृत्युमुळे कोरेगाव मुळसह पूर्व हवेलीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

उरुळी कांचन (पुणे)- मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा अर्थात "मुकद्दर" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय- 33, रा. कोरेगाव मुळ ता. हवेली) या हुरहुन्नरी तरुणांचा मंगळवारी (ता. 26) रात्री साडेअकरा वाजनेच्या सुमारास अपघातात मृत्यू झाला आहे. इतिहासकालीन व्यक्तींच्या जिवणाचा अभ्यास करण्याचा छंद असणाऱ्या स्वप्नील कोलते या तरुणांच्या अपघाताती मृत्युमुळे कोरेगाव मुळसह पूर्व हवेलीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मयत स्वप्नील कोलते मंगळवारी रात्री शिरुरहुन घरी परतत असताना, पुणे - सोलापुर महामार्गावर इनामदारवस्तीजवळ स्वप्नीलच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने वरील अपघात घडला आहे. या प्रकरणी स्वप्नीलचा चुलत भाऊ बाबासाहेब मधुकर कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
भाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक...

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नील कोलते यांचा एका मोबाईल कंपनीचा वितरणाचा व्यवसाय होता. यासाठी स्वप्नीलचे पुणे व शिरुर तालुक्यात येजा होती. दरम्यान मंगळवारी मोबाईल फोनच्या वितरणाचे काम संपवून, घऱाकडे परतत असताना इनामदारवस्ती जवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यात स्वप्नीलच्या तोंडाचे डावे बाजूस, डावे पायास व डावे हातास गंभीर स्वरुपाचा मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नीलच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. 

'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

सिंकदर पुस्तक गाजले... 

इतिहासकालीन व्यक्तींच्या जिवणाचा अभ्यास करण्याचा छंद असणाऱ्या स्वप्नील याने, काही दिवसापूर्वी मराठा साम्राज्यातील विविध सरदार मंडळींच्या जिवनावर "मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा" अर्थात "मुकद्दर" या नावाचे पुस्तक लिहले होते. या पुस्तकामुळे स्वप्निल कोरेगाव मुळसह पूर्व  हवेलीमधील युवा वर्गात चांगलाच फेमस होता. "सिकंदर" या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने, स्वप्नील याने माजी केंद्रिय कृषीमंत्री शऱद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नुकतीच भेट घेऊऩ, वरील दोघांनाही पुस्तकांच्या प्रत भेट दिल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune haveli news swapnil kolte died accident