esakal | पुणे : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था बळकट
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुणे : तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था बळकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण आढळतील, असे गृहीत धरून राज्याच्या आरोग्य खात्याने आरोग्य व्यवस्था बळकट केली आहे. त्यापैकी ३५ टक्के रुग्णांना कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशी अधिकृत माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विषयक तज्ज्ञांनी महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याबाबत अंदाज वर्तविला आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना राज्यांना केल्या आहेत. त्यानुसार गृहीतके मांडून राज्यामध्ये सर्वांगीण तयारी करण्यात येत आहे.

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय असेल, असा काही सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या आधारावर लहान मुलांसाठी काही खाटा आरक्षित ठेवण्यात येतील. कोरोना उपचारासाठी समर्पित रुग्णालयांच्या पाच टक्के खाटा, आरोग्य केंद्रांच्या १० टक्के खाटा मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Coronavirus : राज्यातील ३० टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

ऑक्सिजन व्यवस्थापन

- ऑक्सिजन वितरणासाठी त्याची उपलब्धता, त्याची निर्मिती आणि साठवण यावर लक्षकेंद्रीत करण्यात आले आहे.

- लागणाऱ्या ऑक्सिजनपैकी २० टक्के ऑक्सिजन जनरेशन पद्धतीने म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि टँकरद्वारे उपलब्ध करण्यात येईल.

- उर्वरित ८० टक्के ऑक्सिजन साठवणुकीच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: मुंबई : ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाला वेग

काय आहेत गृहीतके

- एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण हे घरगुती विलगीकरणात असतील

- राज्यातील ३५ टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल.

- या ३५ टक्क्यांपैकी १७.५ टक्के रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतील

- उर्वरित १७.५ टक्के रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार होतील

- ऑक्सिजन सिलींडर स्वरूपात १० टक्के, ड्युरा सिलींडरच्या स्वरूपात २० टक्के

- क्रायोजेनिक टँकच्या स्वरूपात ५० टक्के ऑक्सिजन पुरवठा होईल

loading image
go to top