Pune Rains : डेक्कन, कर्वेनगर, एरंडवण्यात वाहतूक संथ; जाणून घ्या कोठे काय घडले?

टीम ई-सकाळ
Friday, 4 October 2019

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी शहराला तुफान पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार पावसामुळे रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यामध्ये बुडाल्या. तर काही ठिकाणी घरांमध्ये, सोसायट्यांच्या पार्कींगमध्ये पाणी शिरले. तर, दुसरीकडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडली.

पुणे : सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी शहराला तुफान पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार पावसामुळे रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यामध्ये बुडाल्या. तर काही ठिकाणी घरांमध्ये, सोसायट्यांच्या पार्कींगमध्ये पाणी शिरले. तर, दुसरीकडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुक कोंडीमध्ये भर पडली. सायंकाळी घरी जाण्याच्या सुमारासच पावसाने पुणेकरांची अक्षरशः त्रेधातिरपट उडविली. डेक्कन, कर्वेनगर, एरंडवणा, म्हात्रे पुल या परिसरामधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतुक संथ झाली.

सिंहगड रस्त्यावरून जाण्यासाठी लागतोय तब्बल पट वेळ  

जाणून घ्या अजित पवार यांची संपत्ती

पाहा कोठे वाहतूक संथ गतीने
गुरूवारी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरीकांची तारांबळ उडाली होती. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. साडे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. काही मिनीटांमध्येच पावसाने जोर धरला. पाऊसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही अंतरावरील व्यक्ती, वाहनेही दिसणे मुश्‍किल झाले होते. त्यामुळे नागरीकांनी वाहनांचे दिवे लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पावसचार जोर वाढल्यामुळे दुचाकीस्वारांनी बाजुला थांबणे पसंत केले. एक ते दिड तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः ओढ्या-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले. डेक्कन, कर्वेनगर, एरंडवणा, म्हात्रे पुल या परिसरामधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतुक संथ झाली. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यासह काही ठिकाणी मोठी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आगोदरच संथ वाहतुक सुरू असताना रस्त्यावरील चेंबर उघडल्याने रस्त्यांवर पाणी साठले. त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली. ऐन रहदारीच्यावेळी वाहतुक कोंडी निर्माण झाल्यामुळे चाकरमान्यांनी पाऊस थांबल्यानंतर तत्काळ कार्यालयांबाहेर पडण्याऐवजी काहीवेळ थांबण्यास पसंती दिली.

पाषाण परिसरात अज्ञातांकडून तोडफोड

चार चाकी गाड्या पाण्यात
म्हात्रे पुलाजवळील रस्त्यांवर लावलेल्या काही कार, दुचाकी यांसारखी वाहने अक्षरशः पाण्यामध्ये बुडल्या. दरम्यान, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पाणी वेगाने काही भागातील बैठी घरे, झोपडपट्ट्यांमधील घरे व सोसायट्यांच्या पार्कींगमध्ये शिरले. आंबील ओढ्यासह शहरातील ओढ्या-नाल्यांमध्ये दोन-तीन फुट पाणी वाढल्यामुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली.

पार्किंगमध्ये शिरले पाणी
कोथरूड, कर्वेनगर, डेक्कन, एरंडवना या परीसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले व तुंबले होते. तर काही सोसायटयाच्या आतील भागात, पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. म्हात्रे पुलजवळ असलेल्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रस्त्यावरील चेंबरमधून पाणी बाहेर आले. त्यामुळे रस्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले, रस्त्याच्याकडेला थांबलेल्या काही कार पाण्यात अर्धवट बुडाल्या. दरम्यान रस्त्यावर पाणी साचलयाने काही ठिकाणी वाहने संथगतीने पुढे जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune heavy rain traffic update karve road mhatre bridge erandwane

Tags
टॉपिकस
Topic Tags: