पुणे : पाषाणमध्ये अज्ञात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

तोडफोड केलेल्या वाहनात इनोव्हासारख्या महागड्या गाड्यांसह शालेय बस, रिक्षा, टेम्पो तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे.

औंध : पाषाण येथील लमाणवस्तीत दहा ते बारा जणांच्या अज्ञात टोळक्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रकार केल्याची घटना गुरूवारी (ता.3) पहाटे दोन वाजेच्या दरम्यान घडली.

लमाण वस्तीतील रस्त्यावर लावण्यात आलेल्या चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न या टोळक्याकडून केला गेला. या घटनेत 12 चारचाकी व 3 दुचाकींचे नुकसान झाले आहे. तोडफोड केलेल्या वाहनात इनोव्हासारख्या महागड्या गाड्यांसह शालेय बस, रिक्षा, टेम्पो तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे.

पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्वरित घटनास्थळी जाऊन गाड्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. रात्रीच्या वेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरामधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सामान्य नागरीकांनी कष्टातून पै पै जमा करून घेतलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित गाड्यांची तोडफोड कोणी व का केली? याचा शोध चतु:शृंगी पोलीस घेत आहेत. गुरुवारी पहाटे घडलेल्या या घटनेत अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून अज्ञात तरूणांनी हा प्रकार पुर्ववैमनस्यातून केल्याचा अंदाज असल्याचे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले. पुढील तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : अजित पवार यांची एवढी आहे संपत्ती

- Vidhan Sabha 2019 : भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला धडाक्यात सुरुवात

- Vidhan Sabha 2019 : भाजपचा एबी फॉर्म होता पण... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles vandalized by unknown gangs in Pashan