Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Pune Rain : पुणे आणि घाटमाथा परिसरात मंगळवार रात्रीपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. भिरा येथे सर्वाधिक १५८ मिमी पावसाची नोंद झाली असून ताम्हिणी, पोंफळी आदी ठिकाणीही जोरदार पाऊस पडला.
Heavy Overnight Rainfall in Pune District

Heavy Overnight Rainfall in Pune District

esakal

Updated on

Heavy Overnight Rainfall in Pune District : पुण्यात मंगळवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि धरण परिसरात गेल्या २४ तासांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान रात्रभर पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुणे उंड्री, कात्रज भागांत मागील एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे तर मोहम्मदवाडी परिसरातही लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

यामुळे शाळेत जाणरे विद्यार्थी, तसेच कामावर निघालेले नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलेला आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसामुळे महम्मदवाडी-उंड्रीसारख्या भागातील वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या भागात असलेल्या अनेक नामांकित शाळांमुळे सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेत आणि दुपारी सुटण्याच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शाळेच्या बस, पालकांची वैयक्तिक वाहने आणि कार्यालयीन वेळेत जाणारे नागरिक यांच्या गर्दीमुळे रस्त्यांवर तासन्‌तास वाहनांच्या रांगा लागत आहेत.

<div class="paragraphs"><p>Heavy Overnight Rainfall in Pune District</p></div>
Pune Rain : पुण्यात पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यातून दिलासा, पण वाहतूक कोंडी, अपघात, वीज खंडित झाल्याने पुणेकर हैराण

स्थानिक रहिवासी आणि विविध संस्थांनी या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार वाहतूक पोलिस अनेकदा संबंधित चौकांमध्ये उपस्थित नसतात, ज्यामुळे वाहतुकीचा ताण अधिक वाढतो आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि दैनंदिन प्रवासी मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत.

प्रशासनाकडून अपेक्षा

नागरिकांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामध्ये अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात करणे, शाळा वेळांमध्ये समन्वय आणि वैकल्पिक मार्गांचा वापर यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com