पुणे : महिला पशुपालकांच्या कौशल्याचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : महिला पशुपालकांच्या कौशल्याचा सन्मान

पुणे : महिला पशुपालकांच्या कौशल्याचा सन्मान

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरुड (पुणे) : पशुपालक समाजातील महिलांकडे असलेल्या पशुपालन कौशल्याकडे प्रस्थापित समाजरचनेने दुर्लक्षच केले. किंबहुना हे काम म्हणजे गौण असल्याचे मानले. पशुपालन व संवर्धनामध्ये महिलांचे असलेले योगदान लक्षात घेवून अंतरा संस्था पशुपालनात विशेष कौशल्य बाळगणा-या महिलांचा विशेष सन्मान मार्च 2022 मध्ये करणार आहे.

संस्थेने महाराष्ट्रभरात केलेल्या पाहणीतून व आलेल्या प्रस्तावातून रंजना करगळ (पुणे जिल्हा), ताई दिवाकर डंकरवार (चंद्रपूर जिल्हा), सुभद्राबाई येवले (यवतमाळ जिल्हा) यांची निवड केली आहे.

रंजना करगळ यांचे कुटूंब पिढ्यानपिढ्या नारायणगाव ते चाकण या भागात आपल्या मेंढ्यांना घेऊन स्थलांतर करत असते. औद्योगिकीकरण वाढल्याने शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी कांद्या सारखी पिके घेणे बंद करून ऊसाची शेती वाढवली आहे, त्यामुळे मेंढ्यांना चारा कमी झाला आहे. मेंढ्यांच्या चा-याची सोय करण्यासाठी त्या रोज आजूबाजूच्या शेतात जाऊन चाऱ्याची सोय करतात. त्या घेत असलेल्या मेहनतीमुळे मेंढीपालन हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय टिकून आहे. मेंढ्यांना चरायला नेणं, मेंढ्या चरायला नेताना शेतात फवारणी झालेली आहे की नाही हे पाहणे, बाजूच्या शेतात जर पीक असेल तर त्यात मेंढ्या जाऊ नये याची काळजी घेणे, सासूने ज्या प्रकारे गोधड्या करायला शिकवल्या, घोड्यावरचे समान वाहणाऱ्या पिशव्या, घोड्याचे बाशिंग त्याप्रकारे त्या अजूनही बनवतात, बाजारातून विकत आणत नाहीत.

पुरुष मंडळी मेंढ्यांना चरायला घेऊन गेले की मेंढ्यांच्या पिलांची काळजी ताई दिवाकर डंकरवार घेतात. मेंढपाळ वस्तीवर त्या एकट्याच असतात. अनेकदा जंगली श्वापदाची भिती असते. पण डंकरवार त्याला घाबरत नाहीत. साथीचे आजार वा नैसर्गिक संकट प्रसंगी काय काळजी घ्यावी ह्याबद्दल त्यांना उत्तम समज आहे

हेही वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

सुभद्राबाई येवले यांच्या घरातील पुरुष सतत जनवारांमागे बाहेर असतात, त्यामुळे घरातील जनावरांची काळजी घेणे ही कामे महिलाच करतात जसे म्हैस व्यायल्यानंतर त्यांची, बछड्यांची काळजी घेणे, एखादे जनावर आजारी असेल तर त्याच्या हंबरण्यावरून ते आजारी आहे हे ओळखणे. म्हशीला वासरू झाल्यानंतर, तिचे दूध वाटीत काढून त्या स्वतः त्या लहान बछड्याला दूध पाजतात. त्यांना नैसर्गिक वनस्पती औषधी बद्दल माहिती आहे.

अंतराच्या संचालक डॉ. नित्या घोटगे म्हणाल्या की, सकाळी लवकर उठून घराची, गोठ्याची स्वच्छता करणे, जेवणं बनवणे, जनावरांना चारापाणी देणे, आजारी व्यक्ती व जनावरांची काळजी घेणे, शेतीची कामे, घरातील तसेच घराबाहेरील कामेही महिला जबाबदारीने करतात. परंतु महिलांचे हे कुटुंब, समाज यासाठीचे योगदान आपण विसरून जातो. अंतरा संस्था अशा महिलांना त्याच्या ज्ञान आणि कौशल्ये याच्या आधारावर सन्मानित करत आहे. यामध्ये आम्ही बक्षिस रुपात काय देतो यापेक्षा त्यांच्या कौशल्याची दखल समाजाने घ्यावी हा विचार महत्वाचा आहे.

loading image
go to top