esakal | 'आमच्याशी न बोलता कोणाशी चॅटींग करता?' विचारणा करणाऱ्या पत्नीला पतीकडून मारहाण

बोलून बातमी शोधा

crime

या घटनेमुळे घाबरलेल्या फिर्यादीने थेट पोलिस ठाणे गाठून कुणालविरुद्ध फिर्याद दिली.

'आमच्याशी न बोलता कोणाशी चॅटींग करता?' विचारणा करणाऱ्या पत्नीला पतीकडून मारहाण
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : "तुम्ही रोज रात्री उशीरापर्यंत कोणाशी चॅटींग करता ? आमच्याशी का बोलत नाही ? अशी विचारणार करणाऱ्या पत्नीला पतीने कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. त्यानंतर पत्नीसह मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल शेखर चांदेकर (वय 35, रा. विघ्नहर नगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी स्वाती चांदेकर यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा - पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा पती व एक मुलगा असे तिघेजण बिबवेवाडीतील विघ्नहर नगरमध्ये राहतात. शुक्रवारी रात्री कुणाल हा घरात होता. तरीही तो मोबाईलवर चॅटींग करीत बसला होता. त्यावेळी फिर्यादीने त्यास "तुम्ही रोज इतक्‍या रात्री कोणाशी चॅटींग करता, आमच्यासोबत का बोलत नाही ? अशी विचारणा केला. त्याचा राग आल्याने कुणालने फिर्यादीस कमरेचा पट्टा, वायर व लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. तर वडीलांच्या मारहाणीतून आईची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलालाही कुणालने जबर मारहाण केली. तसेच त्या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या फिर्यादीने थेट पोलिस ठाणे गाठून कुणालविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.