सावधान! पान शॉपमध्ये अंमली पदार्थांची विक्री; पुणे पोलिसांच्या धाडी, तक्रारीसाठी नंबर जारी | Video Viral

तक्रार करण्यासाठी नंबरही जारी करण्यात आला आहे.
Viral VIdeo
Viral VIdeoSakal
Updated on

पुणे : पुणे शहरामध्ये पान शॉपमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहर पोलिसांकडून अशा दुकानांवर कडक कारवाई केली जात असून पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर धाड टाकल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

"अनेक तरूणांना अंमली पदार्थांची ओळख करून देण्याच्या टच पॉईंट्सपैकी एक म्हणजे पान-बिडी शॉप होय." असं या व्हिडिओच्या कॅप्शमध्ये लिहिण्यात आलं आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरात अशा प्रकारे अंमली पदार्थांची अवैधरित्या विक्री होत असल्यास तक्रार करण्यासाठी नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

धाडी टाकण्याचे सत्र आणि अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तरूणांनी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याच्या सल्ला देण्यात येत आहे.

Viral VIdeo
Monsoon Session: पडळकरांना शिक्षा ते गोऱ्हे अन् जगताप यांच्यात खडाजंगी; जाणून घ्या अधिवेशनात दिवसभरात काय घडलं?

अधिक माहितीनुसार, २२ डिसेंबरपासून आजपर्यंत तब्बल ८.५३ कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ११८ आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.

कोणत्या क्रमांकावर कराल तक्रार?

आपल्या परिसरातील एखाद्या पान शॉपवर अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करताना निदर्शनास आल्यानंतर CP WhatsApp ८९७५९५३१०० अथवा ट्विटरवर तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरूवात केली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.