khadakwasla
khadakwasla sakal

Pune : खडकवासला,किरकटवाडीत अपूरा पाणी पुरवठा,टॅंकरसाठी लाखोंचा खर्च, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

निलेश बोरुडे

किरकटवाडी: पुणे शहराची तहान भागविणारे खडकवासला धरण हाकेच्या अंतरावर असताना खडकवासला, किरकटवाडी व नांदोशी-सणसनगर या भागातील सोसायट्यांना भर पावसाळ्यात टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पालिकेला कर भरुनही दुसरीकडे पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने पालिकेच्या कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त आहेत. पालिकेकडून मात्र अनेक महिन्यांपासून केवळ डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे असे उत्तर नागरिकांना मिळत आहे.

खडकवासला, किरकटवाडी भागात मोठमोठ्या सोसायट्या असून एकेका सोसायटीत शेकडो सदनिका आहेत. तत्कालीन ग्रामपंचायतींकडून या सोसायट्यांना पाऊन इंचाचे एक किंवा दोन कनेक्शन देण्यात आलेले असून काही सोसायट्यांना तर अद्याप पाण्याचे कनेक्शन मिळालेले नाही.

khadakwasla
Pune News : बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार...

सोसायटीतील रहिवाशांची संख्या आणि होणारा पाणीपुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणात असमतोल असल्याने सध्या पावसाळा सुरू असतानाही अनेक गृहनिर्माण संस्थांनी टॅंकरने पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. या गावांचा पालिकेत समावेश झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल असे नागरिकांना वाटत होते मात्र पालिकेत जाऊन दोन वर्षे उलटून गेले तरीही अद्याप नागरिकांना गैरसोय व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

khadakwasla
Gadchiroli : विकासाचे तीन तेरा, श्रेयासाठी कलगीतुरा

याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र 'नंतर सांगतो' म्हणत त्यांनी टाळाटाळ केली.

"कमी दाबाने व खुप कमी वेळ पाणी येत असल्याने पाणी पुरत नाही. सध्या दररोज पाच टॅंकर विकत घ्यावे लागत असून उन्हाळ्यात दहा ते बारा टॅंकर घ्यावे लागतात. पालिकेने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे." संतोष थोपटे, चेअरमन,मोरयास्पर्श सोसायटी.

"आमच्या सोसायटीला दरमहा सुमारे अडीच लाख रुपये पाणी विकत घेण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. पालिकेला कर भरुन दरमहा पाण्यासाठी अधिकचा मेंटेनन्स द्यावा लागत आहे. अद्यापतरी पालिकेने आमच्या पदरी निराशाच टाकली आहे." अमेय चव्हाण, रहिवासी मधुबन सोसायटी.

khadakwasla
Satara Dahihandi : निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात दहा लाखांच्या दहीहंड्या; दोन्ही राजेंच्या समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

"पालिकेकडे लेखी तक्रार केल्यानंतर डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे असे उत्तर आठ महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. आताही विचारले तरी हेच काम सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. कधी डीपीआर तयार होणार आणि कधी नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणार याचे उत्तर मात्र मिळत नाही." राजू चौगुले, रहिवासी, स्वप्नगंध सोसायटी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com