Pune Weather : राज्यात पुणे सर्वांत थंड शहर ; किमान तापमानाचा पारा ११.७ अंश सेल्सिअसपर्यंत

पुणे हे राज्यातील सर्वांत थंड शहर ठरले आहे. किमान तापमानाचा पारा ११.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून, पुढील दोन दिवस हवेतील गारठा कायम राहील
Pune Weather
Pune Weathersakal

पुणे : पुणे हे राज्यातील सर्वांत थंड शहर ठरले आहे. किमान तापमानाचा पारा ११.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून, पुढील दोन दिवस हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. किमान तापमानाचा पाराही सरासरीपेक्षा वाढलेला होता.

मात्र, उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील किमान तापमानाचा ०.८ अंश सेल्सिअसने पारा घसरला. कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

शहरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान सातत्याने कमी होत आहे. पुढील दोन दिवसही किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज खात्यातर्फे वर्तविण्यात आला. मकर संक्रांतीनंतर कमाल तापमानाचा पारा वाढतो. मात्र, यंदा संक्रांतीनंतर थंडी वाढली आहे.

Pune Weather
Sugar Production : राज्यातील साखर उत्पादन यंदा कमी ; आतापर्यंत ८०६.१६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

उद्यापासून पावसाची शक्यता

जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम असून सायंकाळनंतर गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाजही आहे.

तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • शिरूर ८.२

  • एनडीए ९.३

  • हवेली १०.३

  • माळीण १०.४

  • राजगुरुनगर १०.९

  • पाषाण १२.५

असा वाढला गारठा

तारीख किमान तापमान

  • २१ १३.३

  • २२ १२.५

  • २३ ११.७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com