Sugar production
Sugar productionsakal

Sugar Production : राज्यातील साखर उत्पादन यंदा कमी ; आतापर्यंत ८०६.१६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७२ लाख ३७ हजार क्विंटलने कमी झाले आहे. शिवाय ऊस गाळपही ७४ लाख ३२ हजार मेट्रिक टनांनी कमी झाले आहे.

पुणे : चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामात राज्यातील साखरेचे उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ७२ लाख ३७ हजार क्विंटलने कमी झाले आहे. शिवाय ऊस गाळपही ७४ लाख ३२ हजार मेट्रिक टनांनी कमी झाले आहे. राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी ऊस गळीत हंगामात आजअखेरपर्यंत एकूण ७९४.४८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ८०६.१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

यंदाच्या गळीत हंगामात सहकारी व खासगी मिळून २०७ कारखाने सुरू झाले. अन्य १७ कारखाने यंदाच्या गळीत हंगामात सुरू होऊ शकले नाहीत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार कारखाने बंद अवस्थेत आहेत. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेपर्यंत ८६६.८५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तसेच ८८०.४८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते.

यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत एकूण २०७ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्याच्या साखर आयुक्तालयाने शुक्रवारी ऊस गळीत हंगामाची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, साखर उत्पादनात राज्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून, या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक २०७.१९ लाख क्विंटल इतके झाले आहे. साखर उत्पादनात पुणे विभाग हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून, या विभागात आतापर्यंत १७४.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

Sugar production
Amit Thackrey in Pune: लोकसभेच्या तोंडावर अमित ठाकरे का उतरले पुण्याच्या रस्त्यांवर?

विभागनिहाय पूर्ण झालेले उसाचे गाळप

(लाख मेट्रिक टनमध्ये)

  • कोल्हापूर १८४.८३

  • पुणे १७२.४९

  • सोलापूर १७१.३८

  • नगर १०१.८

  • छत्रपती संभाजीनगर ७५.७६

  • नांदेड ८९.७९

  • अमरावती ७,५०

  • नागपूर २.५१

विभागनिहाय आजअखेरचे साखर उत्पादन

(लाख क्विंटलमध्ये)

  • कोल्हापूर २०७.१९

  • पुणे १७४.७६

  • सोलापूर १५४.८७

  • नगर ९७.०८

  • छत्रपती संभाजीनगर ६४.५६

  • नांदेड ८७.९४

  • अमरावती ६.८३

  • नागपूर १.२५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com