

Cancer
Pune IT Company Accused of Firing Employee Over Cancer Diagnosis : कर्करोगाच्या उपचारावेळी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे कामाहून कमी केल्याचा आरोप करीत पुण्यातील एक आयटी कर्मचारी सोमवारपासून कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे. संतोष पाटोळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते आठ वर्षांपासून एका नामांकित फ्रेंच कंपनीत कामाला होते.
दरम्यान या वर्षी झालेल्या एका वैद्यकीय चाचणीत त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी काही महिने सुट्टी घेतली. मात्र सुट्टीहून माघारी आल्यानंतर त्यांना कंपनीने खोटी कारणे देत कामाहून कमी केले, असा त्यांचा आरोप आहे.
पाटोळे २०१७मध्ये या कंपनीत फॅसिलिटी मॅनेजर या पदावर कामाला रुजू झाले होते. एप्रिल महिन्यात झालेल्या वार्षिक आरोग्य तपासणीवेळी त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी या कर्करोगावर जूनमध्ये उपचार घेतले आणि ते अद्यापही उपचार घेत आहेत. दरम्यान जुलैमध्ये ते पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर त्यांना २७ जुलै रोजी कामाहून कमी करण्यात आले. पाटोळे यांनी काही आर्थिक व्यवहारादरम्यान प्रक्रिया न पाळल्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना कामाहून कमी करण्यात आले असल्याचे कंपनीने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
तर, ते व्यवहार आपण केलेलेच नाही असे पाटोळे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांतील त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. मग जर माझी कामगिरी उत्तम असेल तर मी केलेले व्यवहार तोट्यात कसे असू शकतात? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यावर झालेले आरोप आधारहीन असल्याचे पाटोळे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे त्यांच्या म्हणण्यानुसार या बेकायदेशीर हकालपट्टीमुळे त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर, करिअरवर, कुटुंबावर वाईट परिणाम झाला आहे. सुरुवातीला ते त्यांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची मागणी करीत होते. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे कंपनीने त्यांना झालेल्या दुष्परिणामाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.