पुण्यात पहिल्यांदाच चालणार जेलमध्ये खटला; गुंडाच्या खून प्रकरणाची सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

या खटल्यात आरोपींची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयात हजर करताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच न्यायालयात गर्दी देखील होऊ शकते.

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयीतांवर आरोप निश्‍चिती झाल्यानंतर येरवडा कारागृहातील न्यायालयातच हा खटला चालविला जाणार आहे. विशेष म्हणजे सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहातच खटला चालण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. 20 जानेवारीपासून सत्र आणि विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

COVID-19 Vaccination Drive: PM मोदी करणार शुभारंभ; जाणून घ्या वेळ आणि बरंच काही!​

अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेले देखील हे पहिलेच प्रकरण होते. या प्रकरणात मोक्कानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; ५५ वर्षानंतर घडतोय नवा इतिहास!​

लोंढे याचा भविष्यात जामिनास, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. विकास शहा कामकाज पाहात आहेत. याबाबत अप्पा लोंढे याचा मुलगा वैभव लोंढे (वय 22, उरुळीकांचन, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 28 मे 2015 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना लोंढेचा खून करण्यात आला होता.

पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली

या खटल्यात आरोपींची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयात हजर करताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच न्यायालयात गर्दी देखील होऊ शकते. त्यामुळे कोरोना आणि सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कारागृहातच या खटल्याची सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहात सुनावणी होणार असल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. यापूर्वी अनेकदा प्रथमवर्ग न्यायादंडाधिका-यांसमोर सुनावणी झालेली आहे.
ऍड. बाळासाहेब खोपडे, मुख्य आरोपी गोरख कानकाटे याचे वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune jail trial for first time Hearing of gangster murder case