

Jain Boarding Land Deal Cancelled Political Reactions from Dhankekar and Mohol
Esakal
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. गोखले बिल्डर्सनी याबाबत जैन बोर्डिंग ट्रस्टला ईमेल केलाय. गोखले बिल्डर्स आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे मित्र असल्यानं या व्यवहारात मोहोळ यांचाही हात असल्याचा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. धंगेकर यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानं महायुतीत नाराजीची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांनीही महायुतीत दंगा नको असं म्हणत धंगेकर यांना शांत राहण्यास सांगितलं होतं. आता जागेचा व्यवहार रद्द झाल्यानंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पडद्यामागे काय घडलं हेसुद्धा सांगितलंय.