esakal | झेडपीत एकाच विभागात चिकटलेल्यांच्या बदल्या

बोलून बातमी शोधा

Pune-Zp

पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही विभागांमधील कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात किंवा एकाच टेबलवर ठाण मांडून बसले आहेत. याचा जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे.

झेडपीत एकाच विभागात चिकटलेल्यांच्या बदल्या
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही विभागांमधील कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात किंवा एकाच टेबलवर ठाण मांडून बसले आहेत. याचा जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

त्यामुळे झेडपी मुख्यालयातील कोणत्याही एकाच विभागात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांचा विभागांतर्गत, टेबल बदली किंवा मुख्यालयाबाहेर बदल्या करण्याबाबतचा निर्णय बुधवारी (ता. 4) झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला आहे.  या निर्णयाबाबतचा ठरावही स्थायी समितीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. शिवाय अशा कर्मचाऱ्यांच्या तत्काळ अन्यत्र बदल्या करण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिला आहे. त्यानुसार अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन, तत्काळ बदल्या करण्यात येतील, असे प्रसाद यांनी या वेळी स्थायी समितीच्या सभेत सांगितले.

कोरोना भारतात येऊ दे रे देवा; अभिनेत्याची प्रार्थना 

जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्हा परिषदेतील काही विभागातील आणि काही टेबलावरील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे आपल्याशिवाय येथील कामाचे पानच हलणार नाही, अशी त्यांची मानसिकता बनली आहे. त्यातूनच मनमानी कामाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे विभागांतर्गत बदल्या करण्याबरोबरच टेबल बदलण्याची मागणीही बुट्टे पाटील यांनी केली. त्यांच्या मागणीला ज्येष्ठ सदस्या आशा बुचके, खुद्द जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनीही पाठिंबा देत, अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी केली. त्यानंतर तसा ठरावही करण्यात आला.

पुणे-सोलापूर मार्गावर मेगाब्लॉक: 'या' चार गाड्या शनिवारी रद्द