Pune Crime News : पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; कोथरूडमध्ये तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

Sutarwadi Crime : दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोथरूडच्या सुतारदरा येथे प्रकाश येवले उर्फ लाल्या (२७) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाली. तीन-चार जणांच्या टोळक्याने जुन्या वादातून कोयता, लोखंडी हत्यार आणि लाकडी दांडक्यांनी त्याच्यावर हल्ला केला.
Pune Kothrud Murder: What Happened in Sutarwadi

Pune Kothrud Murder: What Happened in Sutarwadi

esakal

Updated on: 

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. जुन्या वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने आणि लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...