Seat-Sharing Friction: Mahayuti Negotiates Pune and Parbhani Alignments Ahead of MLC Polls
esakal
पुणे : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शिवसेनेत विरोध होत आहे. जागा वाटपाचा तिढा सोडण्यासाठी पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, भाजपमधील इच्छुकांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.