Big Breaking - पुण्यात 13 जुलैपासून कडकडीत लॉकडाऊन

Pune Lockdown Again declare Divisional commissioner deepak mhaisekar
Pune Lockdown Again declare Divisional commissioner deepak mhaisekar

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात 13 ते 23 जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (ता. १३) रात्री १२ पासून २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या काळात भाजी, दूध आणि दवाखाने सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत होते.

दरम्यान, 13 जुलैपासूनचा लॉकडाउन कडक असणार आहे. त्यात भाजी आणि किराणा मिळणार नाही. केवळ अत्यावशक सेवेमधील दूध आणि औषधे मिळणार आहेत. यामध्ये त्या त्या परिस्थितीनुसार लॉकडाउन शिथील करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यासंबंधी स्पष्टीकरण देताना आज (ता. १०) मा. विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्‍हैसेकर, मा. पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम,  मा. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, मा. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्‍त श्री. श्रावण हर्डीकर, मा. पुणे महानगर पालिका आयुक्‍त शेखर गायकवाड, मा. जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
-------------
विकास दुबेच्या एनकाउंटरवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया; म्हणाल्या....
-------------
विकास दुबे एनकाऊंटरमध्ये गेला पण.... हे १० प्रश्न अनुत्तरितच !
-------------
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर कोरोनाचा प्रसार वाढत येत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सरकारच्या निर्देशानुसार कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com