Pune Lok Sabha Election: शिवाजीनगर विधानसभेत काँग्रेसची जुनी ताकद लागली कामाला... तर सुशिक्षित भागातील मतदानाचा मोहोळ यांना फायदा

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघात जवळपास २० लाख ६१ हजार २७६ मतदार असून, त्यातील १३.५१ टक्के म्हणजेच दोन लाख ७८ हजार ५३० मतदार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आहेत.
Pune Lok Sabha Election
Pune Lok Sabha Election esakal

Pune Lok Sabha Election

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सध्या महायुती भाजपचे आमदार असले, तरी या मतदारसंघातील काँग्रेसची जुनी ताकदही या वेळी कामाला लागल्याचा काँग्रेसचा दावा आहे. या मतदारसंघात विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत भाजपच्या बाजूने कौल मिळाला आहे. उच्चभ्रू सोसायट्यांबरोबरच वस्ती भागाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ कोणालाही गृहित धरता येणार नाही, अशी येथील समाज जीवनाची रचना आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात जवळपास २० लाख ६१ हजार २७६ मतदार असून, त्यातील १३.५१ टक्के म्हणजेच दोन लाख ७८ हजार ५३० मतदार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आहेत. या मतदारांपैकी ५०.६७ टक्के नागरिकांनी या लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे.

मतदानाच्या दिवशी पहिल्या टप्प्यात शिवाजीनगरमधील औंध, सकाळनगर, डेक्कन, मॉडेल कॉलनी, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर आदी उच्चभ्रू सोसायट्या, परदेशात राहणारे नागरिक असा हा परिसर परंपरांगत भाजपला मतदान करणारा मानला जातो. परंतु काही भागात दुपारच्या सत्रापर्यंत अल्प मतदान होत होते. त्यामुळे महायुती चिंतेत होती. नंतर मात्र चांगले मतदान झाले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पांडवनगर, शिवाजीनगर पोलिस वसाहत, जनवाडी, गोखलेनगर, बोपोडी या भागात सुरुवातीपासूनच मतदानासाठी उत्साह होता.

येथे भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली ताकद लावल्याचे मतदान केंद्रांबाहेरील कार्यकर्त्यांच्या हालचालींवरून दिसत होते. याउलट काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तळागाळापर्यंत जपलेले संबंध, वेगळ्या धाटणीची आपली स्वतंत्रपणे उभी केलेली ओळख आणि काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची संख्या ही काँग्रेससाठीची जमेची बाजू म्हणता येईल.

या मतदारसंघात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एक लाख ४२ हजार २९९ इतक्या मतदारांनी मतदान केले.

Pune Lok Sabha Election
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

यंदा मागील निवडणुकीच्या तुलनेत एक हजार १६६ इतके मतदान कमी झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाले आहे. परंतु त्याचा फटका काँग्रेसबरोबरच भाजपच्या उमेदवारालाही बसण्याची चिन्हे आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना २५ हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती. यंदाही मोहोळ यांना येथून आघाडी मिळेल, परंतु ती केवळ १० ते १५ हजारांची असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे, तर धंगेकरही चांगली मते मिळवतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीला मताधिक्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाचे असे काही

गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांत मतदारसंघ भाजपच्या बाजूने

सुशिक्षित भागातून झालेल्या मतदानाचा मोहोळ यांना होणार फायदा

सुशिक्षितांपैकी ८० ते ९० टक्के मतदान भाजपला मिळण्याची चिन्हे

बोपोडी, जनवाडी, रेंजहिल्स भागातील ७० ते ७५ टक्के मतदान काँग्रेसला होण्याची शक्यता

Pune Lok Sabha Election
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com