esakal | मांजरी : तब्बल ५० एकरातील ऊस जळाला
sakal

बोलून बातमी शोधा

sugarcane

मांजरी : तब्बल ५० एकरातील ऊस जळाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरी : मांजरी व येडूरवाडी सीमेलगत तब्बल ५० एकरातील ऊस अचानक आग लागून जळाला. त्यात शेतकऱ्यांचे सुमारे 81 लाखावर नुकसान झाले. बुधवारी (ता. १५) दुपारी ही घटना घडली. स्थानिक शेतकरी, चिक्कोडी येथील सरकारी आणि चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमागील नेमके कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी अचानक मांजरी व येडुर येथील शेतकरी पोपट कोळी, सनत कोळी, सुरेश पाटोळे, जयराम कानडे, भगवान हावळे, माधुरी दाभोळे, धोंडीराम बेडगे या शेतकऱ्यांच्या ऊस पिकास अचानक आग लागली. त्यामध्ये पन्नास एकरातील पीक जळून खाक झाले. गेल्या जुलै महिन्यात उसाची लागवड करण्यात आली होती. सध्या पिकाने पक्व अवस्था गाठली होतील. नुकत्याच कृष्णा नदीला आलेल्या महापुरातून कसबसे ऊस पीक वाचले होते. पण पुरामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे पाचट वाळल्याने अचानक या उभ्या पिकास आग लागली. बघता बघता आगीने रौद्र स्वरूप धारण केले.

हेही वाचा: पुण्यातील 'त्या' मुलीवर ठाण्यात आणखी एका तरुणाकडून अत्याचार

परिसरातील स्थानिक शेतकरी, चिक्कोडी येथील सरकारी आणि चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

परंतु तोपर्यंत संपूर्ण पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या घटनेत शेतकऱ्यांचा 50 एकरावरील ऊस भस्मसात झाला. त्यात सुमारे 81 लाखांचे रुपयांचे नुकसान झाले आहे. चिक्कोडी येथील चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना व शिरोळ येथील दत्त कारखान्याला हा ऊस नोंद होता. अध्याप यंदाचा गळीत हंगाम सुरू न झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती. तसेच आगी मागील ठोस कारण समजू शकले नाही.

धुराचे लोळ अन् हळहळ

एकाच वेळी 50 एकरातील ऊस जळत होता. अध्याप पिकाचा पाला काहीसा मऊ होता. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top