Ruby Hall-Ramwadi : रुबी हॉल-रामवाडी ; मेट्रोमार्गाचे होणार उद्‌घाटन

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रोमार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. ६) ऑनलाइन पद्धतीने उद्‌घाटन करणार आहेत.
Ruby Hall-Ramwadi
Ruby Hall-Ramwadisakal

पुणे : रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रोमार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (ता. ६) ऑनलाइन पद्धतीने उद्‌घाटन करणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने महामेट्रोला शनिवारी (ता. २) कळविले, तसेच पिंपरी-चिंचवड ते निगडी विस्तारित मेट्रोमार्गाचे भूमिपूजनही त्याच कार्यक्रमात होणार आहे. मात्र पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्‌घाटनाबाबत केंद्र सरकारने अद्याप काही कळविलेले नाही.

Ruby Hall-Ramwadi
Pune Crime News : मंगळसूत्र चोर पोलीसांच्या जाळ्यात ; आठ गुन्ह्यांची कबुली

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुमारे सहा किलोमीटरचा आहे. या मार्गावरील बंडगार्डन, कल्याणीनगर आणि रामवाडी स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, उद्‌घाटनानंतर प्रवाशांसाठी खुले होणार आहेत, तर येरवडा स्थानकाचे काम अल्पावधीत पूर्ण होणार आहे, तसेच शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भुयारी मेट्रोमार्गाचे काम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड ते निगडी विस्तारित मार्ग ४.४ किलोमीटर अंतराचा आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारीच होणार आहे. पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमानिमित्त बुधवारी कोलकता येथे जाणार आहेत. तेथून मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन व विस्तारित मार्गाचे भूमिपूजन करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने कळविले आहे. मात्र ऐनवेळी त्यात काही बदलही होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com