Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची आणखी दोन स्थानके आजपासून प्रवाशांसाठी खुली, प्रवाशांसाठी मोठा दिलासा

Pune Metro Opens Two New Stations at Balewadi: पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा; दोन नवीन स्थानके सुरू, जाणून घ्या कोणती आहेत स्थानके
Hinjewadi Shivajinagar Metro Pune Two More Stations Open at Balewadi High Street and Balewadi Phata for Passengers

Hinjewadi Shivajinagar Metro Pune Two More Stations Open at Balewadi High Street and Balewadi Phata for Passengers

sakal

Updated on: 

पुणे : हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन मेट्रो स्थानके बुधवारी (ता. २५) दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रवाशांसाठी कार्यान्वित होणार आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे उद्‍घाटन ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे झाले. दुसऱ्या दिवसापासून या मार्गावरील मेट्रो वाहतूक सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ मेट्रो स्थानकांवरून प्रवाशांची वाहतूक सुरू झाली होती. आता बालेवाडी फाटा आणि बालेवाडी हायस्ट्रीट या स्थानकांना रेल्वे सुरक्षा मंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ही स्थानके बुधवारपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहेत.

Loading content, please wait...