Pune Railway : पुणे-मिरज रेल्वे प्रवास होणार वेगवान ; आतापर्यंत २८० किलोमीटरपैकी १९० किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण झाले पूर्ण

पुणे - मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत २८० किलोमीटरपैकी १९० किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावरून रोज सरासरी ४० प्रवासी रेल्वे धावतात. दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या गाड्यांना आता कोणत्याही सेक्शनमध्ये क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही. परिणामी रेल्वे प्रवासात सुमारे २० ते ३० मिनिटांची बचत होणार आहे.
pune
punesakal

पुणे : पुणे - मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत २८० किलोमीटरपैकी १९० किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. या मार्गावरून रोज सरासरी ४० प्रवासी रेल्वे धावतात. दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या गाड्यांना आता कोणत्याही सेक्शनमध्ये क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही. परिणामी रेल्वे प्रवासात सुमारे २० ते ३० मिनिटांची बचत होणार आहे.

पुणे - मिरज रेल्वे मार्गावर नुकतेच ब्लॉक घेऊन पाच किमीचा सेक्शन प्रवासी सेवेत दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता १९० किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ९० किलोमीटर मार्गावर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागेल.

pune
Pune-Nashik Semi High Speed Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीडने संगमनेरची गती वाढणार! औद्योगिकीकरणालाही मिळणार चालना

हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासी गाड्यांच्या वेळेत आणखी बचत होणार आहे. शिवाय या मार्गावर रेल्वे चालविण्याची क्षमतादेखील वाढणार आहे. परिणामी वर्षभरानंतर पुणे - मिरज मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल. गाड्यांची संख्या व गती दोन्हीही वाढणार असल्याने प्रवाशांचा फायदा होईल.

दुहेरीकरण पूर्ण झाल्याने गाड्यांना क्रॉसिंगला थांबावे लागणार नाही. शिवाय यामुळे मार्गावर गाड्या चालविण्याची क्षमता वाढणार आहे.

- बी. के. सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com