esakal | Pune : गर्दीच्या वेळेत मॉकड्रिल केल्याने वाहतूक कोंडीत भर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : गर्दीच्या वेळेत मॉकड्रिल केल्याने वाहतूक कोंडीत भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी तीनच दिवस राहिल्याने नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. नेमक्या गर्दीच्या वेळीच आज सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी मॉकड्रिल घेतल्याने शिवाजी आणि बाजीराव रस्त्यांवरील कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याचा परिमाण म्हणून परिसरातील इतर रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

मॉकड्रिलसाठी शिवाजी रस्ता मॉडर्न कॅफेचौकापासून दगडूशेठ हलवार्इ मंदिरापर्यंत तसेच अप्पा बळवंत चौकाकडून दगडुशेठकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सकाळी ११ दरम्यान हे रस्ते बंद होते. याकाळात वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आला होती. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर कोंडी झाली होती.

दगडूशेठ मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला केला तर त्यांचा सामाना करण्यासाठी अत्यावश्यक तयारीचा भाग म्हणून काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी हे मॉकड्रिल घेण्यात आले होते. मॉकड्रिल संपल्यानंतर त्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र तोपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा: आधी सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध करा!

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते, मंडई व बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी होत आहे. परिणामी शनिपार चौक, मंडई, तुळशीबाग, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तर पावसामुळे अनेक नागरिकांनी चारचाकी वाहने बाहेर काढल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.

दगडूशेठ मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला केला तर त्यांचा सामाना करण्यासाठी अत्यावश्यक तयारीचा भाग म्हणून मॉकड्रिल घेण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसर निर्मनुष्य करण्यासाठी दगडुशेठकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. यावेळीत पर्यायी रस्ते उपलब्ध करून देण्यात आले. मॉकड्रिल संपल्यानंतर त्वरित रस्ते खुले करण्यात आले असून आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.

संगीता पाटील, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक शाखा.

loading image
go to top