पुण्यात देशातील सर्वाधिक ॲक्‍टिव्ह कोरोना रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली होती;मात्र मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे.सध्या पुण्यात मुंबईपेक्षा दुप्पट कोरोनाच्या ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या नोंदली आहे

‘आयटी हब’, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. देशाच्या तुलनेत ७ टक्के, तर राज्याच्या तुलनेत २६.७ टक्के रुग्ण एकट्या पुण्यात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली होती; मात्र मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. सध्या पुण्यात मुंबईपेक्षा दुप्पट कोरोनाच्या ॲक्‍टिव्ह रुग्णांची संख्या नोंदली आहे. मुंबईत ॲक्‍टिव्ह रुग्ण २१ हजार ४३९ असून, पुण्यात ही संख्या आता ५४ हजार ८३८ झाली असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आली. मुंबईमध्ये स्वाइन फ्लूच्या एच१ एन१ विषाणूंचाही मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता; पण तितक्‍यात लवकर तो नियंत्रणात आला. 

पुण्यात कोविड सेंटरमध्ये औषधांचा काळा बाजार 

तसेच, कोरोनाच्या विषाणूंबद्दल दिसत आहे. पुण्यात स्वाइन फ्लू दीर्घकाळ हवेत टिकला. तसाच कोरोना विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे निरीक्षण साथरोग तज्ज्ञांनी नोंदविले. 

पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका​

सर्वाधिक ॲक्‍टिव्ह रुग्ण असलेली शहरे (टक्केवारी)

पुणे     ५४ हजार ७६० (७)
बंगळुर   ४० हजार ४४० (५)
 मुंबई   २० हजार १८० (२)
 पूर्व गोदावरी   १८ हजार ८७३ (२)
 चेन्नई    १२ हजार ०६२ (१.४)
 देशातील ॲक्‍टिव्ह रुग्ण    ८ लाख २१ हजार १६६

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Most Active Corona patients in the country