

Which Gas Leaked on Pune–Mumbai Expressway? Know Its Uses and Health Effects
sakal
Health risks of inhaling ammonia gas: मंगळवारी म्हणजेच ३ फेब्रुवारीला पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर संध्याकाळी सुमारे ५ वाजता खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक गॅस टँकर पलटी झाला आणि लगेच मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती.
त्यानंतर तब्बल ३२ तासांनंतर हा टँकर यशस्वीपणे हटवण्यात आला. पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे दोन्ही मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे सुरळीत सुरू झाली असली तरी टँकरमधून नेमका कोणता गॅस गळती झाला होता, तो कशासाठी वापरला जातो आणि त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.