

पुणे, मुंबईसह रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान मध्यरात्री कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या आग्नेय घाट भागात दरड कोसळल्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबई विभागातील ठाकूरवाडी (TKW) आणि मंकी हिल लूप केबिन (MHLC) दरम्यान 'अप मेन लाइन'वर दरडीचा मलबा पडल्यामुळे, मध्य रेल्वेने सोमवारी १६ गाड्या रद्द केल्या आणि इतर नऊ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत .