Pune Mumbai Intercity: पुणे-मुंबई इंटरसिटीच्या डबे वाढवण्याला ‘ब्रेक’; फलाट आणि पिट लाइन अपुरी, प्रवाशांना नाहक फटका

Pune Mumbai Intercity Coach Expansion Hits Railway Infrastructure: पुणे-मुंबई इंटरसिटीला २२ डब्यांची मागणी रखडली; फलाट, स्टेबलिंग व पिट लाइन अपुऱ्या असल्याने डबेवाढ अशक्य, वाढत्या वेटिंगमुळे दैनंदिन प्रवाशांचे हाल
Pune Mumbai Intercity Coach Demand Rises As Railway Infrastructure Limits Trains To 16 Coaches Despite Heavy Passenger Rush

Pune Mumbai Intercity Coach Demand Rises As Railway Infrastructure Limits Trains To 16 Coaches Despite Heavy Passenger Rush

sakal

Updated on

-प्रसाद कानडे

पुणे: पुणे स्थानकावरील कमी लांबीचे फलाट, अपुऱ्या ‘स्टेबलिंग’ (गाड्या उभ्या करण्यासाठी आवश्यक लाइन) आणि ‘पिट लाइन’मुळे (डब्यांच्या देखभालीची जागा) पुणे-मुंबई इंटरसिटी गाड्यांचे डबे वाढवण्यास ‘ब्रेक’ लागला आहे. २२ डब्यांची जुनी मागणी प्रलंबित असून, सुविधांअभावी रेल्वे प्रशासनाला डबे वाढवणे अशक्य झाले आहे. एका गाडीचे सहा डबे वाढल्यास किमान सहाशे प्रवाशांची सोय झाली असती, परंतु पायाभूत सुविधांच्या अभावाचा थेट आणि नाहक फटका दैनंदिन प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com