पुणे
Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Pune-Mumbai Train : पावसामुळे पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी पुणे ते मुंबई धावणारी सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे आणि मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम मुंबई लोकल सेवेसह पुणे-मुंबई रेल्वेसेवेवरही झाला आहे. दरम्यान मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पुणे-मुंबईदरम्यानच्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

