esakal | सीओईपी येथे महापालिका उभारणार जम्बो हॉस्पिटल; वाचा कसं असणार हे हॉस्पिटल?
sakal

बोलून बातमी शोधा

COEP_Ground

पुण्यातील कोरोना उद्रेक नियंत्रणात येत नसल्यामुळे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती.

सीओईपी येथे महापालिका उभारणार जम्बो हॉस्पिटल; वाचा कसं असणार हे हॉस्पिटल?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावरील अडीच एकर जागेवर अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि ऑक्‍सिजनची सुविधा असलेले सुमारे ८०० बेड्‌सचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. कोरोनाचा भविष्यातील उद्रेक लक्षात घेऊन पुढील सहा महिन्यांसाठीही ही सुविधा महापालिकेकडून उभारण्यात येत आहे. 

'जिल्हा स्वच्छता मिशन'चा एका रात्रीत खेळ खल्लास; राज्यातील स्वच्छता कक्ष इतिहासजमा होणार!​

मुंबई आणि ठाणे येथील कोरोनाचा उद्रेक कमी झाला. मात्र पुण्यातील कोरोना उद्रेक नियंत्रणात येत नसल्यामुळे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यातून पुण्यातील रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी, यासाठी हे हॉस्पिटल उभारण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले होते.

त्यानुसार महापालिकेकडून याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हे जम्बो हॉस्पिटल बालेवाडी येथे उभारण्याचे नियोजित करण्यात आले होते. परंतु ते ठिकाण रद्द करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ते उभारण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. तर आवश्‍यकता भासल्यास दुसऱ्या टप्प्यात 'एसएसपीएमएस'च्या मैदानावर याच धर्तीवर जम्बो हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

मार्केटयार्डात भरदिवसा दिवाणजीला लुटले; वाचा चोरट्यांनी कसे लांबवले सव्वातीन लाख​

यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, "सीओईपीच्या मैदानावर ८०० बेडस्‌चे जम्बो हॉस्पिटल उभारण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना बाधितांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी ही सुविधा उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून पन्नास टक्के खर्च दिला जाणार आहे. सहा महिन्यांसाठी ही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. आवश्‍यकता भासल्यास पुढे देखील सुरू ठेवण्यात येईल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image