माल वाहतूक ट्रकची कार, दुचाकींना जोराची धडक; ५ ठार

अपघात झाल्यानंतर पुणे- नगर रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.
Accident
AccidentSakal

तळेगाव ढमढेरे : चोवीसवा मैल (ता.शिरूर) येथे कासारी फाट्यानजीक पुणे- नगर रस्त्यावर सायंकाळी झालेल्या विचित्र अपघातात पाचजण ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

अपघाताची प्राथमिक माहिती अशी : पुण्याकडून नगरकडे भरधाव जाणारा माल वाहतूक ट्रक (एमएच १२, डीजे ९६५७) दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला पडला. या अपघातात नगरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी इर्टिगा कार (एमएच १२, आर के १२१७) व दोन दुचाकी गाड्यांना ट्रकने जोरात धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात पाचजण ठार झाले आहेत.

Accident
कर्म एकाचे भोग तिसऱ्याला; एका दारुड्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात

मृतांमध्ये दुचाकीवरील विठ्ठल पोपट हिंगडे व रेश्मा विठ्ठल हिंगडे (रा.वासुंडे, ता. पारनेर, जि. नगर) या पती- पत्नीचा तर कारमधील लीना राजू निकशे, तेजेस निकशे व स्वप्निल केंदळे (दांडेकर पूल, पुणे) यांचा समावेश आहे.

मृतांच्या नावांची ओळख उशिरापर्यंत पोलिस मिळवत होते. अपघात झाल्यानंतर पुणे- नगर रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी हळूहळू वाहतूक कोंडी सुरळीत केली. अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com