Pune : नरेंद्र मोदींनी घेतली माजी आमदार लेले यांच्या कुटुंबीयांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजीनगर पोलिस ग्राउंड येथील कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी लेले कुटुंबीयांची भेट घेतली.
Pune
PuneSakal

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यावर असताना कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. अरविंद लेले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आठवणींना उजाळा दिला.

त्यावेळी लेले कुटुंबीयांनी ‘हिंदू सारा एक’ या गीताची फ्रेम मोदी यांना भेट दिली. तर पीएम केअर फंडासाठी २ लाख रुपयांचे समर्पण दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजीनगर पोलिस ग्राउंड येथील कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी लेले कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी अनुराधा लेले, मिलिंद लेले, प्रमोद लेले, शहर भाजपचे सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, सुवर्ण लेले, अंजली लेले उपस्थित होते. डॉ. अरविंद लेले हे १९७८ ते १९८० कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

Pune
PM Modi Speech in Pune : गणेशोत्सवासोबत टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला; पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांच्या कार्याला उजाळा

हेमंत लेले म्हणाले, ‘‘आम्ही बाबांचा ‘कृतार्थ’ हा चरित्र ग्रंत प्रकाशित केला आहे. तो मोदी यांना द्यावा अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यासाठी आज वेळ दिल्याने मोदी यांच्य सारख्या तेजस्वी पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली.

यावेळी मोदीजींनी माझ्या आई सह सर्वांची वैयक्तीक चौकशी केली. नरेंद्र मोदी आणि माझे वडील यांचे चांगले संबंध होते. या भेटीत त्यांनी दोघांच्या स्नेहाच्या संबंधांना उजाळा दिला. ‘‘संपूर्ण समर्पण भावाने भाजपचे काम कर. आपले विचार, तत्त्वांपासून फारकत घेऊन नको, असे मोदिजींनी सांगितले. आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा वर्षाव करणारा ठरला आहे.

Pune
Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? GRP आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम

बापट कुटुंबीयांचे केले सांत्वन

खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे प्रथमच पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी बापट यांचे पुत्र गौरव बापट, सून स्वरदा बापट यांची भेट घेऊन सांत्वन केले.

गिता धर्म मंडळाकडून निमंत्रण

जुलै २०२३ ते जुलै २०२४ हे गीता धर्म मंडळाचे शकत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण आजच्या दौऱ्यात भेट घेऊन देण्यात आले आहे. मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे, सह कार्यवाह मुकुंद कोंढवेकर यांनी आज याचे पत्र मोदी यांना दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com