पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांत

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे, कळंब ते नारायणगाव या दहा किलोमीटर अंतरात ८० ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.
Pune Nashik National Highway
Pune Nashik National HighwaySakal

पुणे - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Pune Nashik National Highway) एकलहरे, कळंब ते नारायणगाव या दहा किलोमीटर अंतरात ८० ठिकाणी मोठमोठे खड्डे (Pit) पडले असून हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचा (Vehicle) खोळंबा होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो, एसटी, ट्रेलर आदी दहा ते १५ हजाराहून अधिक वाहनांची वर्दळ असते. कळंब येथे घोडनदीच्या पुलाजवळ, महाळुंगे फाटा, वर्पेमळा, महानुभवमळा, ४२ मैल, कळंब कॉलनीजवळ व हुतात्मा बाबू गेनू सागर डाव्या कालव्या नजीक पुलावर खड्डे पडले आहेत. त्यातच नारायणगावाहून कळंबकडे येताना उतार असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. एकलहरे परिसरात जवळपास ३० ते ३५ खड्डे आहेत. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे.

Pune Nashik National Highway
पुण्यातील गणेशोत्सव होणार साधेपणाने; गणेश मंडळांचे एकमत

या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना वाहन दुसऱ्या लेनमध्ये जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com