पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway) नवले ब्रीज परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कात्रजकडून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या एका भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चारचाकी वाहनांना जोरदार धडक बसली. या अपघातात अनेक चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.