NDRF : एनडीआरएफला मिळाले जैवरसायन विरोधी वाहन; भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या नवरत्न डिफेन्सची निर्मिती

पुणे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये (एनडीआरएफ) घातक जैविक आणि रासायनिक अस्त्र विरोधी (हझमॅट) चार वाहने दाखल झाली आहेत.
pune NDRF
pune NDRF sakal

Pune News : पुणे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये (एनडीआरएफ) घातक जैविक आणि रासायनिक अस्त्र विरोधी (हझमॅट) चार वाहने दाखल झाली आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्सने विकसित केलेल्या या वाहनांना बुधवारी एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी भारत इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश श्रीवास्तव उपस्थित होते.

पाषाण रस्त्यावरील भारत इलेक्ट्रॉनिक्स येथे आयोजित अनावरण कार्यक्रमात करवाल म्हणाले, ‘‘भारतात आयोजित जी-२० शिखर परिषदेत अत्यंत सुसज्ज असलेल्या या वाहनांचा समावेश करावा, अशी विनंती आम्ही संरक्षण मंत्रालयाला विनंती केली होती. एका वेळी विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी आमच्याकडे असे विशेष वाहन नव्हते, भारत इलेक्ट्रॉनिक्सने ही उणीव पूर्ण केले आहे.’’

pune NDRF
Pashan Sus Road Traffic : पाषाण-सुस रोडवरची वाहतूक कोंडी सुटणार तर कधी ? वाहनांच्या लांबच लांब रांगा video viral

देशभरातील जी-२०च्या आयोजनामध्ये एनडीआरएफ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, शिखर परिषदेतही अशा वाहनांचा समावेश आवश्यक आहे. कारण घातक जैवरसायनांच्या हाताळणीसाठी दिल्ली पोलीस आणि डॉक्टरांना सहज मदत करता येईल, असेही कारवाल म्हणाले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवरत्न डिफेन्सच्या पुणे युनिटने या वाहनांची रचना आणि निर्मिती केली आहे. एनडीआरएफ कडून केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल न्यूक्लिअर वाहनांसाठी जानेवारी २०२३ मध्ये निविदा मिळाली होती.

pune NDRF
Indian Army : वीर जवान तुझे सलाम, शहीद भोईटेंना अखेरचा निरोप; दीड वर्षाच्या चिमुरडीनं दिला भडाग्नी, कुटुंबीयांचा आक्रोश

जी-२० शिखर परिषदेच्या आधी म्हणजेच ३१ ऑगस्टपूर्वी या वाहनांचा पुरवठा करणे आवश्यक होते. आम्ही याचे पालन करत सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत अत्याधुनिक रचना, उत्पादन आणि पुरवठाही केला आहे.

भानू प्रकाश श्रीवास्तव, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत इलेक्ट्रॉनिक्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com