पुणे : रंगभूमीवर नव्या नाटकांचा सुकाळ

प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे वाढला निर्मात्यांचा आत्मविश्वास
 Drama Competition
Drama Competition sakal

पुणे: कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या नाट्यप्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे निर्मात्यांचाही आत्मविश्वास वाढला असून रंगभूमीवर नवीन अनेक नाटके दाखल झाली आहेत. काही जुन्याच संहितांचे नव्या संचात सादरीकरण करणारी नाटके तर काही वैविध्यपूर्ण विषयांवरील नव्या संहिता असलेली नाटके सध्या रंगभूमीवर आली आहेत. रसिकांनाही त्यामुळे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

 Drama Competition
Video: संजय राऊत यांचा कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ- किरीट सोमय्या

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पूर्वी सुरू असलेल्या नाटकांच्या प्रयोगांना पुन्हा प्रारंभ झाला. या प्रयोगांना ५० टक्के उपस्थितीचे बंधन असले तरी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागले होते. या सकारात्मक प्रतिसादामुळे निर्मात्यांचाही आत्मविश्वास वाढला असून नवीन वर्षात अनेक नवीन नाटके आणण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. सध्या रंगभूमीवर ‘वासूची सासू’, ‘संज्या छाया’, ‘३८, कृष्ण व्हिला’, ‘अडलंय का?’, ‘मी, स्वरा आणि ते दोघं’, ‘काळी राणी’ आदी नाटके येत आहेत. विनोदी, रहस्यमय, फार्सिकल अशा नानाविध शैलीतील नाटकांचा यात समावेश आहे. तसेच या निमित्ताने वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणीही लेखकांनी केली आहे.

 Drama Competition
अनेक अखिलेश इथे आहेत म्हणत बापटांनी थोपटली सोमय्यांची पाठ

यातील ‘वासूची सासू’ हे एक विनोदी फार्सिकल नाटक असून यापूर्वी सादर झाले आहे. आता एका नवीन संचात ते रसिकांच्या भेटीला येत आहे. तर ‘संज्या छाया’, ‘३८, कृष्ण व्हिला’, ‘मी, स्वरा आणि ते दोघं’, ‘काळी राणी’ या नवीन संहिता सादर होत आहेत. अनेक दिग्गज कलाकारही या निमित्ताने रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. ‘३८, कृष्ण व्हिला’ या नाटकातून डॉ. गिरीश ओक दीर्घकाळानंतर मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर ‘संज्या छाया’ या नाटकातून वैभव मांगले आणि निर्मिती सांवत यांची जोडी पहिल्यांदाच रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे. यासह निवेदिता सराफ, मनवा नाईक, विजय पटवर्धन, अतुल पेठे, पर्ण पेठे, सुयश टिळक, अभिजीत केळकर हे कलाकारही या नाटकांमधून दिसणार आहेत.

 Drama Competition
डॉ. प्रमोद चौधरी ठरले जैव अर्थव्यवस्थेतील जीवनगौरव पुरस्काराचे पहिले आशियायी मानकरी

‘‘गेल्या दोन वर्षांत प्रेक्षकांची नवीन काहीतरी पाहण्याची भूक अपूर्ण होती. त्यामुळे नवीन वर्षात नवे काहीतरी सादर करण्याच्या उद्देशाने ‘संज्या छाया’ या नाटकाची आम्ही निर्मिती केली आहे. आशय आणि विनोद यांचा अनोखा संगम असणारी हे नाटक असून आजच्या तणावपूर्ण आयुष्यात आनंदी जगण्याचा मंत्र देण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या असलेल्या ५० टक्के उपस्थितीच्या बंधनाने आर्थिक कसरत होत आहे. मात्र प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून नवीन नाटक रंगभूमीवर आणले आहे.’’ - श्रीपाद पद्माकर, निर्माते - ‘संज्या छाया’

‘‘अधिकाधिक मनोरंजन आणि त्याच्या जोडीला थोडासा विचार करायला भाग पाडणारे असे ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या उद्देशानेच मी हे नाटक निवडले. मात्र मुख्य म्हणजे अनेक नाटके रंगभूमीवर दाखल झाल्याने नाट्य कलाकरांना आणि बॅकस्टेज कलाकरांच्या हाताला काम मिळाले आहे, त्यांच्या उदारनिर्वाहाचे प्रश्न सुटत आहेत. त्याचे सर्वाधिक समाधान आहे.’’ - विजय पटवर्धन, अभिनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com