Pune Crime : वास येऊ नये म्हणून लढवली शक्कल, पण...पोलिसांनी; पुण्यात कोट्यवधीची दारू जप्त

Pune News
Pune News

पुणे - नवीन वर्षाच्या स्वागताला १ दिवस उरला आहे. मात्र त्याआधीच पुण्यात कोट्यवधी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. या कारवाईत २ ट्रक आणि त्यात तब्बल २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. (Pune crime News in Marathi)

Pune News
केवळ अल्पसंख्याकच नाही..."; मोदींना पराभूत करण्याच्या रणनीतीवर काँग्रेस नेत्याचं विधान

ऐन "थर्टी फर्स्ट" सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील ७ आरोपीपैकी काही जणांवर याआधी देखील अवैध रित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

या दोन्ही ट्रकमधून ही दारू पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात असताना ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यातील आरोपींनी पोलिसांना संशय येऊ नये यासाठी या दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरून ठेवल्या होत्या. जेणेकरून मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली तरी वास येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com