Pune News : बिबट्याकडून हल्यावर हल्ले, करून शिकार फस्त, तर वनविभाग मात्र सुस्तच

शेळीवर रविवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.
leopard
leopard sdakal

निरगुडसर - आंबेगाव तालुक्यातील भराडी परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले असून कालवडी,शेळ्या फस्त केल्या जात आहे तर दुसरीकडे बिबट्याचे हल्ले वाढून देखील वनविभाग सुस्त असल्याचे दिसत आहे,बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा लावला जात नाही,आता काय माणसावर हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित राहत आहे.

भराडी ता.आंबेगाव येथील चोरटेकडी रस्त्या नजीक शेतकरी बाबाजी बबन खिलारी यांचा शेळीवर रविवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे,गेल्या दोन महिन्यात बिबट्याने चार कालवडी,चार शेळ्या ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पोपट सयाजी बाणखेले,अजित बाळु गावडे,रामदास बजाबा बांगर,हनुमंत अनंथा थोरात या चार शेतकऱ्यांच्या चार कालवडी तर गणपत विष्णू लोंढे यांच्या तीन तर बाबाजी खिलारी यांची एक शेळी अशा एकूण चार शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत,दत्तू टेमकर यांच्या इंग्लिश कुत्र्याचाही बिबट्याने फडशा पाडला आहे. रविवारी रात्री बाबाजी खिलारी यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले,

leopard
Satara Accident : एसटी-दुचाकीच्या धडकेत एक ठार, १५ प्रवासी जखमी

या घटनेची माहिती पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी वनविभागाला दिल्यानंतर सोमवारी सकाळी घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.बिबट्याचे हल्ले वाढले असून त्याचबरोबर दिवसाही बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करून देखील पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

leopard
Nagpur Crime : ‘तू कोण आहे’ म्हणत भांडण सोडविणाऱ्याचा खून

या परिसरात बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या असून दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे यामुळे शेतीकामे करण्यास शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे तरी वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी बाबाजी खिलारी यांचा सह शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com