
काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा घसरुन १० अंशांच्यापेक्षाही खाली गेला आहे.
राज्यात वाहणार थंड वारे; उत्तर महाराष्ट्र, विदर्भात थंडी वाढणार
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. परिणामी या दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा पार घसरला आहे. पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Cold news) काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा घसरुन १० अंशांच्यापेक्षाही खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra Winter Update)
हेही वाचा: राज्यात 'हुडहुडी' नागपूरमध्ये पारा ८.३ अंशांवर
दरम्यान, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) आज पुन्हा एकदा राज्यात थंडीचा तीव्र प्रभाव असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये आज राज्यातील पुणे आणि आसपासच्या परिसरात जमिनी लगतचे वारे पूर्व दिशेने वाहत असून, ते उत्तरेकडून वळून राज्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात थंड व कोरडे वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्याची तीव्रता अधिक असल्याने राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत या वाऱ्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढणार आहे.
उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा प्रभाव विदर्भात दिवसागणिक वाढत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या पाच दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल सात अंशांची घसरण झाली. गुरुवारीही तापमानात दीड अंशांची घट होऊन पारा या मोसमात चौथ्यांदा दहाच्या खाली म्हणजेच ८.३ अंशांवर आला. नागपूरचे आजचे किमान तापमान विदर्भात सर्वात कमी ठरले. तशी नोंद प्रादेशिक हवामान विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. याशिवाय गोंदिया (८.८ अंश सेल्सिअस), बुलडाणा (८.८ अंश सेल्सिअस), ब्रम्हपुरी (९.८ अंश सेल्सिअस), अकोला (९.३ अंश सेल्सिअस), वर्धा (९.४ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (१० अंश सेल्सिअस) येथेही लाटेचा तीव्र प्रभाव जाणवला.
हेही वाचा: पुढील २४ तासांत 'या' राज्यांत गारठा वाढणार; हवामान विभागाची माहिती
Web Title: Cold Dry Winds Blowing In Maharashtra North State And Vidarbha Will Be Affected
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..