pune mahapalika
pune mahapalika sakal

Pune News : 'लाभार्थीं'ची चर्चा अन होर्डिंगवर कारवाई

वडगाव शेरीतील माजी नगरसेविकेने या होर्डिंगमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे जोडून आयुक्तांकडे (ता 8 सप्टेंबर) कारवाईची मागणी केली होती.

वडगाव शेरी - कल्याणीनगर पुलालगत महानगरपालिकेच्या मालकीचे दोन होर्डिंग एका खासगी व्यावसायिकाने परस्पर भाड्याने दिले होते. त्यातून वर्षभरापासून महिना पाच लाख रुपये भाड्याची 'मलई' मिळत होती.

काही जागृत कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याने या मलईतील 'लाभार्थीं'ची चर्चा परिसरात चांगलीच रंगू लागली होती. ती थांबवण्यासाठी अखेर या फलकांवर कारवाई झाल्याचे समजते.

विमानतळ, कल्याणीनगर, विमाननगर, आणि कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागाला जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे येथे एका होर्डिंगला महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये भाडे मिळत होते. येथील महापालिकेचे दोन्ही होर्डिंग पूर्वी एका खाजगी संस्थेला निविदा काढून भाड्याने देण्यात आलेले होते. पुढे त्या कराराची मुदत संपल्यानंतर पुन्हा निविदाच काढण्यात आली नव्हती.

pune mahapalika
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीनंतर नितीन गडकरींनी दिले 'हे' आदेश

ही बाब एका खाजगी जाहिरातदाराने हेरून दोन्ही होर्डिंग भाड्याने दिले होते. काही कार्यकर्त्यांनी ही बाब नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शनास आणली होती. मात्र तरीही गेली अनेक महिने विविध कारणे सांगून कारवाई टाळण्यात येत होती.

शेवटी वडगाव शेरीतील माजी नगरसेविकेने या होर्डिंगमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे जोडून आयुक्तांकडे (ता 8 सप्टेंबर) कारवाईची मागणी केली होती. तरीही कारवाई टाळण्यासाठी एका माजी महापौरांचे नाव सांगून हा खाजगी व्यावसायिक संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणत होता.

pune mahapalika
Pune News : राज्यातील आयटीआयचे विद्यार्थी धावणार ‘रन फॉर स्किल’ स्पर्धेत

मात्र या प्रकरणाची आणि त्यातील 'लाभार्थींची' सुरस चर्चा नगररस्ता परिसरामध्ये रंगू लागल्यानंतर शेवटी महानगरपालिकेच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली होर्डिंग वर कारवाई (ता ९) करण्यात आली. त्यानंतरही यातील लाभार्थींची चर्चा आजही सुरूच आहे.

pune mahapalika
Pune : मुळशीत अकरा लाख रुपये किंमतीचे दोन टन भेसळयुक्त खव्याचे पदार्थ जप्त

'लाभार्थीं'ची होणार चौकशी ?

सदर होर्डिंग महापालिकेचे होते. मात्र भाड्याने देण्याची निविदा निघाली नव्हती. त्याचा खाजगी जाहिरातदाराकडून वापर सुरू होता. शिवाय नदी सुधार प्रकल्पात अडथळा येत असल्यामुळे होर्डिंग काढण्याची गरज होती. त्यामुळे उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. महापालिकेचे होर्डिंग भाड्याने कोण देत होतं याची चौकशी करीत आहे. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू. -

सोमनाथ बनकर (सहाय्यक आयुक्त, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com