Video: पुण्यात शिंदे गट-ठाकरे गटात राडा! पोलिस घटनास्थळी दाखल

Pune News
Pune News

पुणे - निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेनेचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. मात्र पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला आहे.

Pune News
Uddhav Thackeray : भाजपला कळत नाहीये, जेवढं अडचणीत आणलं जाईल...; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

पुण्यात एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.

Pune News
Pune News : पुण्यात शिंदे गट-ठाकरे गटात राडा! पोलिस घटनास्थळी दाखल

यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. पुण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरअध्यक्ष संजय मोरे, तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे यावेळी उपस्थितीत होते. तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याने काहीच वेळात पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com