Pune News : पावसामुळे होर्डिंगच्या आडोशाला थांबलेल्यांवर काळाचा घाला; पाच जणांचा मृत्यू

Pune News
Pune Newsesakal

पुणेः पिंपरी चिंचवड येथील किवळे येथे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

सोमवारी (ता. १७) सायंकाळी किवळे, देहूरोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरात पाऊस झाला. यामुळे अनेक नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी होर्डींगच्या आडोशाला थांबले होते.

Pune News
Ajit Pawar : तो मी नव्हेच! अजित पवार यांच्याकडून आणखी एकदा सारवासारव

त्याचवेळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले. या होर्डिंगच्या खाली थांबलेले काहीजण त्याखाली अडकले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. होर्डिंग हटवून जखमींना रुग्णालयात हलविण्याचे काम सुरु आहे.

सहा क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झालेली आहे. बचावकार्यासाठी स्थानिकांचीही मदत होत आहे. बचाव पथकाने एकाला सुखरुप बाहेर काढल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com