Pune News: आनंदाची बातमी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती!

पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
आनंदाची बातमी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती!
Pune Newssakal

Katraj News: मागील काही दिवसांपासून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारने मंजूर केलेले १४० कोटी रुपये मिळण्यास विलंब झाला होता.

परंतु, आता ती रक्कम त्वरित मिळणार असून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरण आणि भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी करण्यात आली.

आनंदाची बातमी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती!
Katraj Navale Bridge Road : कात्रज-नवले पूल रस्ता होणार तरी कधी? संथ कामामुळे नागरिक त्रस्त

यामध्ये कात्रज चौकातून येणाऱ्या उड्डाणपुलाची लांबी वाढवून गोकुळनगर चौकाच्या पुढे नेण्यात येणार आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होत असल्याचे कारण देत लांबीला नकार देण्यात येत आहे.

तसेच, राजस सोसायटी चौकाच्यापुढे भूसंपादन झाले नसल्याने त्याठिकाणी तत्काळ उड्डाणपूल उतरविणे अशक्य असून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी उर्वरित जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आनंदाची बातमी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती!
Katraj Navale Bridge Road : कात्रज-नवले पूल रस्ता होणार तरी कधी? संथ कामामुळे नागरिक त्रस्त

शत्रुंजय मंदिर चौकातील ग्रेड सेपरेटर आणि खडीमशीन चौकातील ग्रेट सेपरेटरच्या कामांना गती देण्यात येणार आहे. या दोन्ही ग्रेड सेपरेटरचे काम पुढील महिनाभरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यावेळी पथ विभागाचे अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, उपअभियंता धनंजय गायकवाड, कनिष्ठ अभियंता राजेश्वरी मुरादे उपस्थित होते.

आनंदाची बातमी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती!
Katraj News : कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव निम्मा रिकामा

शत्रुंजय मंदिर चौक आणि खडीमशीन चौकाजवळील भुयारी मार्गांची पाहणी करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या कामाला गती देण्यात येईल. त्याचबरोबर, इतर ठिकाणीही तत्काळ भूसंपादन करण्याच्या दृष्टिकोनातू प्रयत्न करण्यात येणार आहेत.

तसेच, माऊली चौकात अंडरपास करतेवेळी कुठल्याही प्रकारचे वाहतूक नियोजन बिघडू नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून ही पाहणी करण्यात आली आहे. - साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथविभाग, महापालिका

आनंदाची बातमी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला मिळणार गती!
Katraj Fire Brigade : कात्रज अग्निशामक दलाची भरीव कामगिरी ; पाच वर्षात ८६१ आगीच्या आणि १०९ अपघातांच्या घटनांचा सामना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com