Katraj News : कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव निम्मा रिकामा

यंदा उन्हाच्या झळा तीव्र असल्याचे जाणवत असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशातच अनेक धरणांनी तळ गाठला असून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कात्रज तलावानेही तळ गाठला आहे. नानासाहेब पेशवे तलवाच्या साखळीतील दुसरा तलाव म्हणजे कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव होय.
katraj news
katraj newssakal

Katraj News : यंदा उन्हाच्या झळा तीव्र असल्याचे जाणवत असून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशातच अनेक धरणांनी तळ गाठला असून राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कात्रज तलावानेही तळ गाठला आहे. नानासाहेब पेशवे तलवाच्या साखळीतील दुसरा तलाव म्हणजे कात्रज प्राणिसंग्रहालयातील तलाव होय. हा तलाव सद्यस्थितीत निम्यापेक्षा अधिक रिकामा झाल्याचे दिसून येत आहे.

या तलावामुळे परिसरातील जैवविविधता टिकून राहिली आहे. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तलाव पूर्ण भरून वाहिल्याने पाणी आंबील ओढ्यात आले होते. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ आणि जलपर्णीही निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या सांडपाणी आणि मलनिस्सारण विभागाने याठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्याचे काम हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात आहे.

गाळ काढण्याच्या उद्देशाने तलावातील पाण्याची पातळी सायफन पद्धतीने कमी करण्यात आली होती. तसेच, येणाऱ्या काळात यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निधी मंजूर झाला आहे. तो प्राप्त झाला की, गाळ काढण्याचे काम करण्यात येणार असून आणखी मोठ्या प्रमाणात तलावाचे खोलीकरण करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेने गतवर्षीही जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम केले होते.

कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या १३० ऐकरपैकी २९ एकरांवर हा तलाव असून याच्या वर म्हणजे मुख्य कात्रज (नानासाहेब पेशवे) तलाव आहे. या दोन्ही तलावातील पाण्याचा पुरवठा साखळी पद्धतीने शनिवारवाडा आणि जुन्या पुण्यातील काही भागात भुयारी मार्गाने केला जात असे. या भुयारी मार्गादरम्यान काळा हौद, बाहुलीचा हौद, बदामी हौद, सदाशिव पेठ हौद येथे पाणी काढले जायचे. १९९० पर्यंत तलावातील पाण्याचा पुरवठा शहराला केला जायचा, असे इतिहासकार सांगतात.

katraj news
Katraj Zoological Museum : कात्रज प्राणी संग्रहालयाची वर्षभरात सात कोटींची कमाई

प्रतिक्रिया

पाण्याची पातळी खाली गेली आहे. एवढी पाण्याची पातळी कधीही खाली गेली नव्हती. किमान याचा फायदा घेऊन महापालिकेने तलावातील गाळ काढावा असे आम्हाला वाटते. याचा नक्की फायदा होईल.

- वर्षा नाडकर्णी, स्थानिक नागरिक

आपण केवळ दहा फूटापर्यंत पाणी कमी करत असतो. मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे. अनेकवेळा सायफननेही पाणी कमी होते.

- संतोष तांदळे, अधिक्षक अभियंता, मल्लनिसारण विभाग

katraj news
Katraj News : बेजबाबदार नागरिकांमुळे कात्रज घाटात 'घाण'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com