esakal | Pune: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नारायणगाव : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : येथील गव्हाळी मळा शिवारात कुत्र्याचा पाठलाग करत असताना कठडे नसलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात जुन्नर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना यश आले. विहिरीतुन काढण्यात आलेला बिबट्या नर जातीचा असून सुमारे साडे तीन वर्षे वयाचा आहे. बिबट्याला आज सकाळी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आशी माहिती निवारा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर, वन क्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.

दै. सकाळच्या नारायणगाव येथील वृत्तपत्र विक्रेत्या सुरेखा वसंतराव खैरे यांच्या गव्हाळी मळा शिवारातील विहिरीत आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्या पडला. बिबटया विहरीतील वीज पंपाच्या पाईपचा आधार घेऊन सकाळी सात वाजेपर्यंत विहिरीत होता.या बाबतची माहिती स्थानीक नागरिकांनी वनपाल मनीषा काळे यांना दिली. सकाळी आठ वाजता वन क्षेत्रपाल अजित शिंदे, वनपाल काळे,माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बनगर, कर्मचारी महेंद्र ढोरे, आकाश डोळस, वैभव नेहरकर घटनास्थळी दाखल झाले. या वेळी बिबट्याला पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. वनविभागाच्या रेसिक्यु पथकाने प्रथम दोरीने बांधलेला लोखंडी पाळणा विहिरीत सोडला.

हेही वाचा: अकोला : लक्झरी बस अडवून ५० लाख रूपयांची रोकड लंपास

पोहून दमलेला बिबट्या अलगद जाऊन पाळण्यावर बसला. त्या नंतर पाळण्याच्या जवळ पिंजरा सोडण्यात आला. बिबट्या पाळण्याचा आधार घेत पिंजऱ्यात बसला. त्या नंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला अलगद बाहेर काढण्यात आले. आज सकाळी बिबट्याला तपासणीसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. वेळेत पाण्यातून बाहेर काढल्याने बिबट्याला जीवदान देण्यात यश आले असून बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नाही.निवारा केंद्रात बिबट्यांची संख्या बत्तीस झाली आहे. आशी माहिती डॉ. बनगर यांनी दिली.

मनीषा काळे( वनपाल, जुन्नर उपवनसंरक्षक विभाग) : रात्रीच्या वेळी भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत बिबटे व अन्य वन्य प्राणी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. कठडे नसल्याने विहिरीत वन्य प्राणी पडत आहेत.उन्हाळ्यात हे प्रमाण जास्त असते. शेतकऱ्यांनी विहिरीना बांधकाम करून कठडे बसवल्यास वन्य प्राण्यांचे संरक्षण होईल.

loading image
go to top