Pune News : महाराष्ट्र सेटची नोव्हेंबर अखेर घोषणा

महाराष्ट्र सेटचे वेळापत्रक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ
सावित्रीबाई फुले विद्यापीठ sakal

पुणे - राज्यातील प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा अर्थात महाराष्ट्र सेटचे वेळापत्रक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. नुकतेच मार्च २०२३ मध्ये ३८ व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सप्टेंबर संपला तरी सेटची घोषणा न झाल्यामुळे उमेदवार अस्वस्थ होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली असून, नोव्हेंबर अखेर परीक्षेची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सेटच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (सेट) आयोजन करण्यात येते. १७ शहरांमध्ये आयोजित होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून एक लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. सर्वच विद्याशाखांतील एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाते. सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेबरोबरच पीएचडी प्रवेशासाठीही या परीक्षेचा विचार करण्यात येतो. त्यामुळे राज्यभरातील सर्वच पदव्युत्तर पदवीधारक या परीक्षेसाठी अर्ज करतात.

विद्यापीठाकडून मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या सेट परीक्षेमध्ये ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले होते. परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून एक लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख एक हजार २५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सहा हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदाही एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देण्याची शक्यता आहे.

सेट म्हणजे काय

विद्यापीठ अनुदान आयोगाने वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक पदासाठी किमान पदवीबरोबरच पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. महाराष्ट्रामध्ये १९९४ पासून राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेटचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे करण्यात येते. सेट परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी कोणतीही तरतूद नाही.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ
Pune : पिरंगुटला सातव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

सेटसाठी पात्रता

- उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच विषयाची परीक्षा त्याला देता येते.

- एखाद्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात सेट परीक्षा घेतली जात नसेल तर त्या विषयाशी संबंधित इतर विषयाची परीक्षा देता येते.

- इंग्रजी किंवा मराठी या दोन माध्यमातून परीक्षा देता येते.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ
Pune : आकाशात झेपावणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो रंगला....!!

मार्च २०२३ मध्ये पार पडलेल्या सेट परीक्षेचे नुकतेच निकाल जाहीर झाले आहे. आता पुढील सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घोषित करण्यात येईल.

- डॉ. प्रफुल्ल पवार, सदस्य सचिव, महाराष्ट्र सेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com