पुणेः पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्धेला बाहेर काढण्यात आले यश

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मंचर (पुणे) : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुराच्या पात्रात खडकावर अडकलेल्या शशिकला दत्तात्रय डोके (वय ७०) या वृद्धेला चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

मंचर (पुणे) : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे घोड नदीच्या पुराच्या पात्रात खडकावर अडकलेल्या शशिकला दत्तात्रय डोके (वय ७०) या वृद्धेला चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

शशिकला या धुणे धुण्यासाठी नदीतील खडकावर गेल्या होत्या. डिंभे धरणातून घोड नदीत पाणी सोडल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. खडकाला पाण्याने वेढा दिला. पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने तिला वाचविण्यासाठी गावकर्यांनी प्रयत्न सुरु केले. मंचर पोलिसांना सदर घटना कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, नायब तहसीलदार विजयराव केंगले घटनास्थळी आले. एन. डी. एफ. च्या जवानांनाही याबाबत कळविण्यात आले. यानंतर डिंभे धरणातील पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, शशिकला डोके या जीव वाचविण्यासाठी मदतीचा आक्रोश करत होत्या. अखेर काही तरुण दोराच्या सहाय्याने डोके यांच्या पर्यंत पोहचले. आज (शुक्रवार) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 

Web Title: pune news manchar water women safe