Pune News : दाक्षिणात्य चित्रपट डब चालतो, मंग मराठी का नाही? महेश मांजरेकरांचा सवाल; रंगभूमी दिनानिमित्त मुलाखत

निर्माता म्हणून मांजरेकरांचे पहिले नाटक म्हणजे ‘केवळ तुझ्यासाठी’.
mahesh manjrekar
mahesh manjrekar sakal

पुणे - चित्रपट मोठा केला तो मराठी माणसानेच. आज आपण मागे पडलोय, कारण आत्मविश्वासच नाही. दीड कोटीत होणारा चित्रपटही तसाच असणार ना? प्रेक्षक आज जगभरातील चित्रपट पाहत असून, त्यांनी नेहमीच दर्जेदार पटकथेला भरभरून दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या मराठी चित्रपट सृष्टीत प्रज्ञावंत दिग्दर्शकांची वानवा नाही. तुम्हाला जर दाक्षिणात्य चित्रपट डब केलेला चालतो, मंग मराठी का नाही? असा थेट प्रश्न दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे.

बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘सकाळ’च्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत महेश मांजरेकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश ओक यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीच्या आजच्या स्थितीबद्दल मांजरेकरांनी भाष्य केले. ते म्हणाले, आपला आजचा विचार बदलायला हवा. मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही, ही ओरड खोटी आहे. थिएटर मालकांना भाषेशी नाही तर चालणाऱ्या चित्रपटांशी देणे-घेणे आहे. ‘बाई पण’ला थिएटर मिळालेच ना? प्रेक्षक आज जास्त सजग झाला आहे. त्याला प्रत्येकवेळी स्टार नकोय.’’ यावेळी त्यांनी कन्नडा चित्रपट सृष्टीचे उदाहरण दिले.

अपयशातून शिकलो...

निर्माता म्हणून मांजरेकरांचे पहिले नाटक म्हणजे ‘केवळ तुझ्यासाठी’. त्याची आठवण काढताना मांजरेकरांनी ‘हे वळ तुझ्यासाठी’ अशी मिस्कील टिपणी केली. व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरलेल्या या नाटकाबद्दल मांजरेकर म्हणाले, ‘‘माणूस अपयशाला घाबरतो. परंतु, आयुष्याच्या अपयश जे शिकविते, ते यशही शिकवू शकत नाही. ते नाटक केले म्हणून मी आयुष्यात पुढे काही करू शकलो.’’ भविष्यासाठी केलेली बचत खर्च करून केले ध्यानीमनी या नाटकाचे तोट्यात गेलेले पहिले पाच प्रयोगही मांजरेकरांनी हिशोबासहीत सांगितले. पण, सहाव्या प्रयोगापासून आलेले व्यावसायिक यशाने त्यांचे करिअरच बदलले.

mahesh manjrekar
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांची रंगभूमीदिनी मुलाखत

‘आज’च्या साठी जगा....

कर्करोग असतानाही मांजरेकरांनी बिगबॉसचे चित्रीकरण पूर्ण केले. कर्करोगाविरूद्धची लढाई सांगताना मांजरेकर म्हणाले, ‘‘तुम्ही मरेपर्यंत जिवंत आहात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगण्या आधीच मी तयार होतो. आपण काही गोष्टी स्वीकारल्या तर त्रास कमी होतो. तुमची इच्छाशक्ती सर्व काही ठरवते. प्रत्येक दिवस हा शेवटचा असू शकतो. म्हणून आजसाठी जगा.’’

mahesh manjrekar
Mahesh Manjrekar: माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल तर.. महेश मांजरेकरांच्या विधानाची एकच चर्चा

नव्या रंगकर्मींना सल्ला...

- ग्लॅमरच्या पाठी धावू नका, शेवटी ‘अभिनय’च चालतो

- काम कसे चांगले कराल, याचा विचार करा. पैसा आपोआप येतो.

- तुमच्यासाठी फक्त ‘स्काय इज लिमिट

- अभिनयासाठी तुमच्यातील २०० टक्के द्या

- संघर्षाच्या काळात थोडी आर्थिक तरतूद करा

- विश्वास आणि प्रतिभा असेल तरच भिडा

- जमिनीवर राहायला शिका

mahesh manjrekar
Mahesh Manjrekar : पहिली पसंती अभिनयालाच, पण झालं उलटं!

एकांकिका स्पर्धांमुळेच आज मी येथे आहे. आजही मी एकांकिका स्पर्धांना जाऊन बसतो, कारण त्यांच्यातूनच अनेक दर्जेदार नट मिळाले आहेत.

- महेश मांजरेकर, दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com