Pune News :'आरोग्यम्' क्लिनिक ऑन व्हिल्स्’चे उद्घाटन; भारतातील पहिले हाय- टेक मोबाईल

‘आपलं घर’च्या कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्य - चित्रपट अभिनेते भरत जाधव व अभिनेत्री खासदार जयाप्रदा यांची उपस्थिती
pune
punesakal

खडकवासला - एकुलत्या एक मुलाचा आजाराने मृत्यू होतो. त्यानंतर आत्महत्या करण्यापर्यंतचे आलेले नैराश्य. अन त्यातून भरारी घेत समाजसेवेचा आदर्श उभा करणारे ‘आपलं घर’ चे विजय फळणीकर, त्यांची पत्नी साधना, माझ्यासाठी मानवरूपात विठ्ठल- रुख्मिणी आहेत.” असे गौरवोद्गार प्रसिद्ध चित्रपट-नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी ‘आपलं घर’च्या वतीने 'आरोग्यम्' क्लिनिक ऑन व्हिल्स्’चे उद्घाटन कार्यक्रमात काढले. यावेळी सुप्रसिध्द चित्रपट तारका जयाप्रदा यांनी देखील ‘या उपक्रमात तुम्ही एकटे नाहीत, आम्ही सर्व सोबत आहोत.’ असा दिलासा देखील विजय फळणीकरांनां दिला.

टि-सिस्टीम्स कंपनीच्या आर्थिक सहकार्याने भारतातील पहिले हाय- टेक मोबाईल 'आरोग्यम्' क्लिनिक ऑन व्हिल्स्’चे उद्घाटन अभिनेत्री जयाप्रदा व अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले. श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालयाच्या ‘स्तन कर्करोग निदान शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम डोणजे येथील स्व.वैभव फळणीकर मेमोरियल फाऊंडेशनच्या ‘आपलं घर’च्या संस्थेत रविवारी संपन्न झाला.

मोबाईल क्लिनिकमुळे दुर्गम गावात, वाड्या- वस्त्यांवरही रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. असे सांगून भरत जाधव म्हणाले, फळणीकरांनी समाजसेवेचा वसा, सततचे परिश्रम आणि कर्तव्यभावना कायम ठेवली आहे. यामुळे येथील वास्तूत सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. येथील काम ‘आपलं घर’ नावाप्रमाणे आपलेपणाने, गोडव्याने सुरू आहे. माझ्या पुण्यातील प्रयोगातील दहा तिकिटे ‘आपलं घर’साठी राखीव असतील. अशी घोषणा ही जाधव यांनी केली.

pune
Pune News : नेताजी पालकरांचा ऐतिहासिक वाडा आज मोजतोय अखेरच्या घटका

अभिनेत्री जयाप्रदा म्हणाल्या, महिला स्वत:च्या आजारांविषयी उघडपणे बोलत नाहीत. ग्रामीण भागात तर अधिक संकोचाने त्या आजार लपवतात. अशा महिलांसाठी आपलं घर’ची आरोग्य शिबिरे जीवन बदलवणारी ठरतील. आरोग्यम’मुळे गरीब, गरजू रुग्णांना डॉक्टरांकडे जाण्याची गरज नसून, डॉक्टरच त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे.

pune
Pune News : नेताजी पालकरांचा ऐतिहासिक वाडा आज मोजतोय अखेरच्या घटका

‘आरोग्यम’ उपक्रमासाठी टी - स्सिटीम्स कंपनीचे आर्थिक सहकार्य मिळाले आहे. प्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर शेठ, निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे ही मनोगते झाली. टी-सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन, उपाध्यक्ष मिलिंद कौलगुड, मुख्य वित्त अधिकारी विनीत पाटील, संचालक प्रसाद सरदेशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. विजय फळणीकर यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. मान्यवरांचे सत्कार फळणीकर यांनी केले. राजेश मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.

pune
Pune News :पुण्याप्रमाणे बारामतीतही मिळकत धारकांसाठी लॉटरी योजना राबवा- अजित पवार

काय आहे ‘आरोग्यम्’

'आरोग्यम्' क्लिनिक ऑन व्हिल्स्’ मध्ये अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत. सर्व प्रकारचे प्रथमोपचार, नेत्रतपासणी, दंतरोगतपासणी व निदान तसेच उपचार, ओरल कॅन्सर स्क्रिनिंग, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग, डेंटल एक्स-रे तसेच जनरल चेकअप कंपार्टमेंट आहेत. केमिकल टॉयलेटची सुविधा यामध्ये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com